News not found!

खेळघर शैक्षणिक मदत आवहन

आगामी प्रकार: 
खेळघर
संक्षिप्त माहिती: 

खेळघर शैक्षणिक मदत आवहन

प्रिय मित्र - मैत्रिणीनो,

जून महिना जसा जवळ येतो तसतशी खेळघरातल्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाची, प्रवेशांची, त्यासाठीच्या निधीची काळजी मनात उभी राहू लागते.
गेली काही वर्षे तुम्हा सर्वांच्या मदतीने खेळघर शैक्षणिक मदतीचा हा प्रकल्प पुढे नेत आहे.

यावर्षी चार मुली आणि एक मुलगा अशा ५ जणांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातल्या संतोष पवारला ७९ टक्के मार्क मिळाले तर सपना वाघमारेला ७० टक्के! हे दोघे नक्कीच चांगली करियर करतील. बाकीच्या चौघानाही पुढे शिकण्याची इच्छा आहे.. ६ जणानी बारावी आणि पाच जणांनी ११ वी. ची परीक्षा दिली आहे. १२ वी ला बसलेल्या मुलांना इंग्लिश विषयात पास होणे खूप अवघड जाते आहे. त्यातले चौघेजण पुन्हा जुलै मध्ये इंग्लिशचा पेपर देतील. खेळघर त्यांचे इंग्लिशचे विशेष वर्ग घेत आहे... सर्वांनाच पुढे शिकण्याची मनापासून इच्छा आहे.
खूप वर्षात तुम्ही खेळघरात येऊन प्रत्यक्ष मुलांना भेटला नाही आहात, या वर्षी वेळ काढता येईल का? १७ जूनला खेळघराचे स्नेहसंमेलन आहे, सोबत आमंत्रण जोडले आहे ह्या निमित्ताने आपली भेट होईलच. पण मला वाटते युवकगटाच्या मुलांशी शांतपणे भेटून संवाद साधण्यासाठी वेगळी वेळ ठरवावी. मुलांशी प्रत्यक्ष बोलून तुम्हालाही प्रकल्पाचा थोडा अंदाज येईल. शुक्रवारी २२ जूनला संध्याकाळी भेटायचे का?
तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे ...
शुभदा जोशी, वैशाली सपकाळ आणि शैलजा अराळकर