News not found!

संस्था परिचय

संस्था परिचय

कजा कजा मरू - बालभवनची प्रकाशन संस्था

दिल्लीच्या भारत ज्ञान-विज्ञान समितीनं मुलांसाठी अतिशय सुंदर, दुर्मीळ अशी साधारणत: २०० पुस्तकं प्रकाशित केली आहेत. ही सर्व पुस्तकं इंग्रजी आणि हिंदी भाषेत आहेत. ही पुस्तकं मराठी भाषेतून यावीत, ती मराठी मुलांपर्यंत पोचावीत म्हणून २००३ साली गरवारे बालभवननं स्वत:ची प्रकाशन संस्था सुरू केली. कवयित्री सरिता पदकी यांच्या ‘गुलटं आणं’ म्हणजे ‘उलटं गाणं’ या कवितेतील ओळी ‘कजा कजा मरू’ म्हणजे ‘मजा मजा करू’ असं त्या प्रकाशनाचं अतिशय गंमतीशीर नाव आहे. भारत ज्ञान-विज्ञान समितीनं पुणे विद्यापीठातील आयुका येथील चिल्ड्रन सायन्स सेंटरचे संस्थापक श्री. अरविंद गुप्ता यांची अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत.

बालभवन बालभवन...

जागोजागी बालभवनं सुरू व्हावीत अशी इच्छा बालभवनाच्या बैठकांमध्ये व्यक्त केली जायची, आणि प्रशिक्षणांना येणार्‍या प्रत्येक सह्भागींला ‘आपण बालभवन सुरू करावं’ असं नेहमीच वाटत असतं. मात्र बालभवन सुरू करावं असं वाटणं आणि ते सुरू करणं इतकंच नाही तर वर्षानुवर्षं चालवणं यामध्ये फरक असतो. एकंदर चर्चांमध्ये येणार्‍या संदर्भांवरून निदान 350-450 बालभवनं सुरू झालेली असावीत आणि त्यातली तीनशे तरी आजमितीला सुरू असावीत, असं दिसतं. (शोभाताईंशी बोलताना त्या ठिकठिकाणी सुरू झालेल्या बालभवनांचे संदर्भ आठवणीनं सांगतात.

आनंदाचे डोही आनंद तरंग

आमची सई, मे महिन्यात ३ वर्षांची झाली आणि आम्ही तिला बालभवनच्या महिनाभराच्या उन्हाळी शिबिरात घातलं. रस्त्याने येता – जाता गरवारे बालभवनच्या मैदानावर खेळणारी छोटी छोटी मुलं दिसायची, तेवढीच माझी बालभवनशी ‘तोंड ओळख’ होती. सई आधी सुट्टीत अणि मग जूनपासून रोजच बालभवनला जाऊ लागली. तिला नेता – आणता, मीही बालभवनमध्ये रुळायला अन रेंगाळायला लागले. काही दिवसांत माझ्याही नकळत बालभवन कुटुंबाचीच झाले.

भानुदासकाका आणि सुनीताबाई (मुलाखत)

भानुदासकाका आणि सुनीताबाई कवे बालभवनचा एक अविभाज्य भाग आहेत.
बालभवनच्या अगदी सुरुवातीपासून ते दोघं बालभवनबरोबर आहेत. बालभवनच्या आवारातच ते राहतात. भानुदासकाकांची वॉचमन म्हणून नेमणूक झाली आणि सुनीताबाई मदतनीस म्हणून इतर कामं करत आल्या आहेत.
प्र.– बालभवनमधलं काम कसं शिकलात?

बालभवनं विस्तारताना

१९८५ साली बालभवन सुरू झालं आणि वर्षभरात मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली. आम्ही ताया मनातून खूप आनंदलो. त्यामुळे एक झालं, मुलांना बालभवनची किती गरज आहे हे लक्षात आलं.

ताईच्या नजरेतून बालभवन

बालभवनमधे गट घेणार्‍या ‘कार्यकर्तीला’ जवळिकीच्या नात्याने ‘ताई’असे म्हटले जाते. आई, आजी, मावशी, काकू ही नातीही आपुलकीची असतात. तरी ‘ताई’ ह्या नात्यात ‘समवयस्कता’ जाणवते. शाळेत बाई किंवा सर असतात, तिथे शिक्षक आणि मूल यात एक दुरावा जाणवतो. तो एखाद्या व्यक्तीला ‘ताई’ म्हणून हाक मारल्याने एकदम कमी होतो आणि बालभवनची ताई आणि मूल हे एक जिवाभावाचे नाते तयार होते.

असे उभारले बालभवन…

मानसशास्त्राच्या दृष्टीने ज्यांचे बालपण समृध्द असते, ज्यांना मोकळेपणाने वैयक्तिक वा सांघिक खेळ खेळता आलेले असतात, समवयस्कांबरोबर विचारांची देवाणघेवाण झालेली असते अशी मुले मोठेपणी सकारात्मक नागरिक बनू शकतात. म्हणून घरी वा शाळेत जे आनंदाचे अनुभव मुलांना मिळत नाहीत ते देण्याचा प्रयत्न बालभवनमध्ये करण्याचा द्रष्टा विचार आबासाहेब गरवारे यांचा होताच; परंतु त्याचबरोबर व्यापात असणार्‍या आईवडिलांसाठीही त्यांच्या मनात वेगवेगळ्या योजना होत्या.

आम्ही मिळवू पंख नवे… आम्हाला बालभवन हवे...

१९७९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर झालं होतं. पालक-शिक्षक संघानं इतर काही संस्थांना एकत्र करून शनिवारवाड्यावर मोठा कार्यक्रम केला. बालकांच्या गरजा त्यातून मांडल्या होत्या. श्रीमती शांताबाई किर्लोस्करांनी एक गाणं लिहिलं होतं –
जागवा जागवा, सकल विश्व जागवा
बालकांस अग्रहक्क, हाच मंत्र गाजवा
शरीर बनो सुदृढ सबल, सदय मने हात कुशल
या जगती शांती, बुध्दी, मैत्री, प्रेम जागवा
अशी त्याची पहिली दोन कडवी होती.

असू दे, असू दे, बालभवन असू दे !

१९७९ साल हे आंतरराष्ट्रीय बालकवर्ष म्हणून जगभर साजरं केलं गेलं. पुण्यातही त्यावेळी खूप उपक्रम झाले. पण तेवढ्यापुरते उपक्रम होऊन तिथेच थांबू नयेत तर मुलांसाठी नियमितपणे काम चालावं अशी कल्पना पुढे आली. गरवारे बालभवनचा जन्म या संकल्पनेतून झाला आणि १ सप्टेंबर १९८५ रोजी ते बाळ संचालिका शोभा भागवत यांच्या ओटीत आलं. शोभाताईंनी अतिशय सक्षमपणे, संवेदनशीलतेनं व सर्जनशीलतेनं आजवर सांभाळलं. त्याचा नावलौकिक केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. या कार्याला (१) आदिशक्ती पुरस्कार-पुणे; (२) डॉ.

समाजाच्या आरोग्यासाठी बालभवन

मी खेळू कुठं? मी नाचू, गाऊ कुठं?
मी कुणाशी बोलू?
बडबड केली की आई रागावते,
खेळायला लागलो की बाबा चिडतात,
जरा उड्या मारल्या तर ‘एका जागी बस बरं’ म्हणतात,
गाणं म्हणलं तर गुरकावतात ‘गप्प बस’.
मी जाऊ तरी कुठं आणि करू तरी काय?
... गिजुभाई बधेका (बालदर्शनमधून)