News not found!

बालशिक्षण

बालभवनात बहरताना...

बालभवन हे मुलांसाठीचं हक्काचं स्थान ! इथल्या वातावरणामुळे, उपक्रमांमुळे मुलांमधील सुप्त गुणांना फुलायची संधी मिळते. १९८८मध्ये बालभवनच्या प्रशिक्षणानंतर मला जाणवलं की आपल्याला मुलांमध्येच काम करायचं आहे. बालभवनचं मोकळ्या उत्साहानं भरलेलं वातावरण आणि परस्परांमधला आपलेपणाचा व्यवहार बघून तर मी बालभवनचीच झाले.

गाज बालभवनाची

आधी खेळायला मग ताई म्हणून शिकवायला आणि आता पालक म्हणून असं विविध टप्प्यांवर बालभवन अगदी जवळून बघितलं, अनुभवलं. उद्घाटन समारंभापासूनची दृश्यं आजही जशीच्या तशी आठवतात. एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी आपली आई घेणार, यातून दहाव्या वर्षी वाटलेला अभिमान आणि आपली आई आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना अशी वाटलेली अस्वस्थता हे दोन्ही अनुभवल्याचं आठवतं. मुलांना मोकळीक देणं म्हणजे काय असतं हे मला कधी पुस्तकात वाचावं लागलं नाही कारण स्वतः मूल असल्यापासून मिळणाऱ्या वागणुकीतून ते मी अनुभवलं. बालभवनमुळे फक्त स्वतःची मोकळीक नाही तर आजूबाजूच्या सर्वांना मिळणारी मोकळीक महत्त्वाची असल्याचं समजलं.

बालभवन: बालकारणाचे पहिले पाऊल

‘बालकारण’ हा शब्द ताराबाई मोडक यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष वेधताना आणि बालशिक्षणाविषयी जागृतीची चळवळ उभारताना वापरला, आणि आता बालह्क्काच्या सर्व प्रयत्नांना तो कवेत घेत आहे. बालविकास, बालरंजन, बालसाहित्य यांकडे प्रौढांनी एक जबाबदारी म्हणून बघायला पाहिजे, ही जाणीव गेल्या शतकात झालेल्या अनेक बदलांची परिणती आहे. औद्योगिक प्रगती, महानगरी समाज आणि आक्रसत गेलेला कुटुंबाचा आकार या सर्व गोष्टींचे परिणाम लक्षात येऊ लागल्यावर मुलांच्या खुरटणार्या विश्वाची बोच निर्माण झाली.

ऑगस्ट २०१६

Magazine Cover

बागकाम करणं, दुकानजत्रा, स्वैपाक करणं यासारख्या कृतींमधून शिकणारी काही मुलं

भाषा घरातली आणि शाळेतली

ज्या ठिकाणी मुलाची घरची भाषा शाळेतील भाषेपेक्षा बरीच वेगळी असते तिथे सुरुवातीच्या काळात दोन्ही भाषांतून मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यातील वारली मुलांशी संवाद साधताना '‘काय कसं काय चाललंय?'’ असं विचारण्याआधी ‘'कशिक गोठ?'’ असं म्हटलं की मुलांचे चेहरे उजळतात. मग हळूहळू मुलं '’काय कसं काय चाललंय'’ या प्रश्‍नालाही प्रतिसाद द्यायला लागतात.

अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञांच्या मते, मुलांच्या घरात वा परिसरात विपुल प्रमाणात बोलली जाणारी भाषा ही मुलांच्या आरंभिक शिक्षणाचे माध्यम म्हणून सर्वोत्तम ठरते. कारण या भाषेवर मुलाने शाळेत येण्यापूर्वीच बरेच प्रभुत्व मिळवलेले असते. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर कोकणात, खानदेशात, मराठवाड्यात, विदर्भात, पश्‍चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा आणि प्रमाण लेखी मराठी यात बरेच अंतर आहे. आदिवासी भागातल्या स्थानिक भाषांच्या बाबत हे अंतर खूपच मोठे आहे. अशा परिस्थितीत शाळेत माध्यम म्हणून वापरली जाणारी मराठीची प्रमाण बोली व मुलाची घरची बोली यात असणारे अंतर हा एक मह्त्त्वाचा शैक्षणिक मुद्दा ठरतो.

जून २०१६

Magazine Cover

गायन-वादन व चित्रकला हा प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना क्वेस्टच्या सक्षम या कार्यक्रमांतर्गत युनिसेफच्या सहकार्याने गेली चार वर्ष या विषयांचे पद्धतशीर शिक्षण दिले गेले. यासाठी शाळेतील कला शिक्षक व कला क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांनी एकत्रित काम केले. मुलांच्या चित्रकलेच्या शिक्षणाचे नियोजन कसे करावे याची छोटेखानी शिक्षक-हस्तपुस्तिका या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात येत आहे. त्यातले काही वर्ग आणि मुलींनी केलेल्या कला-कामाचे हे काही नमुने...

एप्रिल २०१६

Magazine Cover

आदिवासी मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचावे यासाठी क्वेस्टतर्फे पुस्तकगाडी हा उपक्रम केला जातो. मुलांची साक्षरता दृढ होण्यामध्ये बालपुस्तकांचे मोठे योगदान असते असे अलीकडील संशोधन दाखवते. या गाडीबरोबर चार प्रशिक्षित व्यक्तीही जातात व त्या मुलांसोबत पुस्तकांशी संबंधित विविध खेळ, उपक्रम करतात. आठवड्यातून एकदा येणाऱ्या गाडीची मुले आतुरतेने वाट पाहत असतात.

मार्च २०१६

Magazine Cover

क्वेस्टच्या अंकुर या बालशिक्षण कार्यक्रमांतर्गत ११० अंगणवाड्यांसोबत काम केले जाते. स्वच्छता हा या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. कचरापेटीचा वापर, आरसा आणि कंगव्याचा वापर, नाक पुसायला कापडाचे लहान लहान तुकडे वापरणे, अशा छोट्या छोट्या व्यवस्थांमुळे अंगणवाडी स्वच्छ आणि प्रसन्न राहाते. अंगणवाडीत लागलेल्या स्वच्छतेच्या या सवयी मुलांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतील.