News not found!

खेळघर मित्र मेळावा

आमंत्रण

खेळघर मित्र मेळावा

खेळघराच्या मित्रांना खेळघराची प्रत्यक्ष झलक अनुभवायला मिळावी, यासाठी एक कार्यक्रम आखला आहे. दि. १०/०३/२०१८ रोजी खेळघरात, सायंकाळी ४-९ या वेळात शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन पहाणं, खेळघरातील मुलांशी गप्पा, त्यांच्याकडून विज्ञानाचे प्रयोग, वैज्ञानिक खेळणी बनवायला शिकणे असा विविधांगी कार्यक्रम आखला आहे. खेळघरासमोरील प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दल संवाद साधण्यासाठीही या कार्यक्रमात विशेष वेळ राखून ठेवला आहे. या कार्यक्रमात आपण आपल्या मित्र –परिवारासह जरूर सहभागी व्हावंत अशी विनंती आहे.

आणखी काही नव्या लोकांना खेळघराशी जोडून घेता यावे यासाठी तुमच्या परिचयातल्या लोकांशी जरूर संपर्क साधावा. त्यासाठी काही वेगळा मजकूर या मेल सोबत जोडला आहे.
सविस्तर माहितीसाठी खालील पत्र वेळ काढून वाचावंही विनंती!

खेळघर कार्यकर्ते
_________________________________________________________________
प्रिय मित्र,

या क्षणी आपल्याशी संवाद साधतांना तीन वर्षापूर्वी खेळघरासमोर आलेला समर-प्रसंग आठवतो आहे. आठ वर्षे सातत्यानं खेळघराला आर्थिक मदत केल्यानंतर टाटा ट्रस्टनं ही मदत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आमच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. याचा कामावर परिणाम होतोय की काय अशी भीती मनात उभी ठाकली होती.

परंतु या काळात आपल्याकडून मिळालेल्या भक्कम आधारावर आम्ही या प्रसंगातून तगून गेलो . दरम्यान नऊ महिन्यानंतर टाटा ट्रस्टने आणखी तीन वर्षाकरिता खेळघराला आर्थिक मदत दिली. या तीन वर्षात खेळघराचे काम वाढले, बहरले, स्थीर-स्थावरही झाले. लक्ष्मीनगर मधील मुला-पालकांपर्यंत अधिक नेमकेपणानं पोचता येणे शक्य झाले. तसेच JCB,CEQUE, Bharat Forge LTD, Gyanprakash Foundation अशा संस्थांच्या माध्यमांतून महाराष्ट्रभरातल्या अनेक शिक्षण–कार्यकर्त्यांपर्यंतही पोचता आले.

मात्र आजचा प्रश्न मागच्यापेक्षाही गंभीर आहे. या पुढील काळात टाटा ट्रस्टची मदत मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. आज घडीला कुठलीच ठामेठोक आर्थिक मदत मिळेल अशी दिशा डोळ्यांसमोर नाही. विविध CSR च्या माध्यमातून मदत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु त्यांच्या निकषांनुसार आजवरच्या कामाच्या दिशेत कॉम्प्रमाईज न करण्याचा निर्णय खेळघराने घेतला आहे.

या पुढील काळात व्यवस्थापकीय कामांसाठी खेळघराच्या आजवर साठवलेल्या निधीवरच्या व्याजाचा उपयोग करता येईल. तसेच खेळघर विस्तार प्रकल्प, प्रशिक्षणांच्या मानधनातून चालू राहील. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो लक्ष्मीनगरमधील पहिली ते बारावी या वयोगटातल्या १५० मुले आणि त्यांच्या पालकांबरोबरच्या कामासाठीच्या निधीचा! यासाठी मात्र मित्र-मंडळीच्या मदतीवरच अवलंबून रहावे लागणार आहे. हा खर्च आज घडीला वर्षाला सुमारे १५,००,०००/- आहे.

खेळघराची सर्वात जमेची बाजू म्हणजे माणसं ! खेळघरावर जिवापाड प्रेम करणारे आणि कामात स्वयंसेवी सहभाग घेणारे कार्यकर्ते आणि मुलांना अतिशय प्रेमानं शिकवणारे शिक्षक असा आमचा २० जणांचा एकसंध गट ही खेळघराची खरी ताकद आहे.
या जोडीला आम्हाला आधार आहे तो दरवर्षी नेमानं ठराविक रकमेची किंवा वस्तूंची मदत करणाऱ्या आपल्या सारख्या मित्र-मैत्रिणींचा! तुमच्या अतिशय व्यस्त दिनक्रमामध्येही खेळघराची आठवण तुमच्या मनात जागी असते याची प्रचिती आम्हाला अनेकवार आली आहे.

आज पुन्हा एकदा तुमची मदत मागण्यासाठी हे पत्र लिहित आहे. तुमच्याकडून यथाशक्ती मदत खेळघराला मिळेल हा विश्वास आहेच त्याबरोबरच तुमच्या परिवारातल्या मंडळीना, मित्र – सहका-यांना खेळघराची ओळख करून देता यावी यासाठी दि.१०/०३/२०१८ रोजी, ५ ते ९ या वेळेत खेळघर मित्र -मेळाव्याचे आयोजन केले आहे. या निमिताने आपण सर्वांनी भेटावे, विचाराचे आदान प्रदान करावे, खेळघराच्या मुला-शिक्षकांबरोबर एक सायंकाळ घालवावी असे मनापासून वाटते आहे. या मेळाव्यात आपल्याला खेळघरातल्या मुला-मुलीशी संवाद साधायची, खेळायची, त्यांच्याकडून विज्ञानाचे प्रयोग शिकायची संधी आहे.

आजच वेळ राखून ठेवा आणि जरूर जरूर या मित्र - मेळाव्यात सहभागी व्हा! तुम्ही येऊ शकाल ना, आणखी कुणाला बरोबर आणाल याबद्दल फोनवर बोलूच.

आपले,
पालकनीती खेळघराचे कार्यकर्ते.

खेळघर मित्र –मेळावा
दिनांक – १०/०३/२०१८
वेळ - ४ ते ९
स्थळ - खेळघर, शुभदा जोशी,
गुरुप्रसाद अपार्टमेंट, २३, आनंदनिकेतन सोसायटी, कर्वेनगर, पुणे - ४११०५२.
फोन नंबर - ०२०- २५४५७३२८, ९८२२८७८०९६, ९७६३७०४९३०, ९८२२०९४०९५.
इमेल –khelghar@gmail.com
वेबसाईट- www.palakneeti.org
Bank details- Account Name- PALAKNITI PARIWAR , Bank- STATE BANK OF INDIA, A/C NO 35689944253, BRANCH DECCAN GYMKHANA (PUNE) , IFS CODE - SBIN0001110