News not found!

खेळघर प्रशिक्षण शिबीर

आनंदाने शिकण्याच्या दिशेने....
पालकनीती परिवार, खेळघर कार्यशाळा

प्रिय मित्र – मैत्रिणींनो,

पालकनीतीचं खेळघर गेली २० वर्षे ‘वंचित मुलांचं शिकणं आनंदाचं व्हावं आणि जाणिवांचा विकास व्हावा’ यासाठी काम करत आहे. आम्हाला उलगडलेली आनंदानं शिकण्या - शिकवण्याची पद्धती समविचारी शिक्षक - कार्यकर्त्यांबरोबर वाटून घेण्याकरता २००७ पासून खेळघरातर्फे दरवर्षी ५ दिवसांची कार्यशाळा आखली जाते. २०१७ मध्ये या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या १० वर्षांत महाराष्ट्रभरात १०-१२ ठिकाणी नव्या खेळघरांच्या कामाने आकार घेतला. अनेक शिक्षक – कार्यकर्त्यांना ते करत असलेल्या कामात मदत मिळाली.

सहभागींना शिकण्यातल्या आनंदाची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, स्वतःच्या दृष्टीकोनांना तपासून बघत मनामध्ये या प्रक्रियेचा अर्थ प्रतिबिंबित व्हावा अशी या कार्यशाळेची रचना असते. या देवाणघेवाणीतून मुलांबरोबर काम करताना प्रोत्साहन मिळेल, मदत होईल अशा अनेक कल्पना, पद्धती आपल्या हाती लागतील.

आमचे ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ हे पुस्तक तयार झाले आहे. या हाती आलेल्या पुस्तकाची भक्कम साथ आपल्याला शिबीरादरम्यान आणि नंतरही मिळणार आहे. शिबिरात सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला या पुस्तकाची प्रत मिळेल. या कार्यशाळेत आपली किंवा आपल्या संस्थेतील कुणा व्यक्तींची सहभागी होण्याची इच्छा असेल तर आम्हाला कळवावे.

वेळ : दिनांक १७ ते २१ जानेवारी २०१८, सकाळी ९ ते सायं. ६
स्थळ : जे.पी. नाईक सेंटर, एकलव्य पॉलीटेक्निकजवळ, कोथरूड, पुणे ४११०३८
सहभाग मूल्य : ५५००/- रुपये (चहा, दुपारचे जेवण, खेळघर हस्तपुस्तिका आणि इतर शैक्षणिक साहित्य) ज्यांना निवासाची सोय हवी असेल त्यांना १५०० रुपये वेगळे भरावे लागतील.

आपले,

खेळघर कार्यकर्ते,
शुभदा जोशी, ज्योती कुदळे, सुषमा यार्दी
फोन नंबर्स - ०२०- २५४५७३२८, ९८२२८७८०९६, ९७६३७०४९३०, सुषमा यार्दी - ९८८१७१९३१९.

खेळघर कार्यशाळेची रचना

पहिला दिवस - १७ जानेवारी २०१८, बुधवार

सकाळी ९.०० ते १०.०० - नाव नोंदणी

सकाळी १०.०० ते ११.०० - प्रार्थना, खेळघरातील कार्यकर्त्यांची ओळख आणि प्रास्तविक

सकाळी ११.०० ते १२.०० - सपोर्ट ग्रुप्समध्ये गटकाम – खेळघर गट

दुपारी १२.०० ते १.३० - खेळघर संकल्पना समजून घेणे – वैशाली सपकाळ

खेळघर हस्तपुस्तिकेची ओळख – शुभदा जोशी

दुपारी २.३० ते ३.३० – शिकण्याच्या प्रकियेचा प्रत्यक्ष अनुभव – खेळघर गट

सायंकाळी ३.३० ते ६.०० - आपण कसे शिकतो? शिकणे - शिकवणे बहारदार कसं होईल?

ज्योती कुदळे आणि शुभदा जोशी

सपोर्ट ग्रुप्सबद्दल थोडेसे

शिबिराच्या पहिल्या दिवशी दहा ते बारा सहभागी आणि एक खेळघराची ताई यांचा मिळून एक सपोर्ट ग्रुप बनेल. परस्परांमध्ये मोकळा संवाद व्हावा, सहभागींचा प्रतिसाद आम्हाला समजावा हा यामागचा उद्देश आहे. पाच दिवसांच्या या शिबिरामधील पहिल्या दिवशी जे सपोर्ट ग्रुप्स तयार होतील त्यानुसारच पुढील पाच दिवस गटकाम होईल.

दुसरा दिवस - १८ जानेवारी २०१८, गुरुवार

सकाळी ९.०० ते १.०० - जीवनभाषा शिक्षण - वर्षा सहस्रबुद्धे

दुपारी २.०० ते ६.०० - भाषिक व गणिती उपक्रम - खेळघर गट

तिसरा दिवस - १९ जानेवारी २०१८, शुक्रवार

सकाळी ९.०० ते १.०० – कृतीतून आनंददायी गणित शिक्षण

सुषमा यार्दी, सुमित्रा मराठे, संध्या फडके

दुपारी २.०० ते ६.०० – विज्ञान – निरीक्षण – विश्लेषण – दृष्टीकोन - विपुल अभ्यंकर

चौथा दिवस - २० जानेवारी २०१८, शनिवार

सकाळी ९.०० ते १.०० – जीवनकौशल्ये फुलावीत म्हणून - शुभदा जोशी, ज्योती कुदळे

सकाळी २.०० ते ६.०० – कला आणि कल्पकता - आभा भागवत

पाचवा दिवस - २१ जानेवारी २०१८, रविवार

सकाळी ९.०० ते १.०० – जीवनकौशल्ये संबंधित उपक्रम – खेळघर गट

दुपारी २.०० ते ४.०० – सर्वंकष मूल्यमापनाचे आपल्या कामातील महत्त्व - सुमित्रा मराठे

सायंकाळी ४.०० ते ६.०० – आढावा