News not found!

खेळघरातील दिवाळी

दरवर्षी खेळघरातील दिवाळी ही नवे नवे रूप घेऊन येते. खेळ्घराच्या कुटुंबात खूप माणस आहेत म्हणजे अगदी शाळेत न जाणार्यांपासून ते कॉलेज,नोकरी करणार्यांपर्यंत , महणून प्रत्येकाला
दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी छोट्यांची आणि मोठ्यांची दिवाळी वेगवेगळी साजरी करण्याचे ठरले त्यानुसार नियोजनही झाले .

दिवाळी - लहान मुलांची


DSC03081.JPGछोट्या मुलांसाठी खर तर खेळघरात जाणं म्हणजे मजेची धमाल ट्रिपच असते .तिथली मोकळी जागा ,ते मातीच घर , तो खुणावणारा झोका अन गच्चीतून दिसणार मोकळ आभाळ हे सर्व पाहण्यासाठी , अनुभवण्यासाठी मुलं संधी शोधतच असतात.
दिवाळीच्या दिवशी प्रत्येकजण खूप सुंदर दिसत होतं. मुले नटली तर होतीच पण त्यांच्या आनंदी, प्रसन्न चेहऱ्यामुळे ती अजूनच सुंदर दिसू लागली होती . खेळघरात मुलाचं स्वागत सुंदर रांगोळीने आणि तायांच्या प्रेमळ हास्याने झाले. आम्ही सगळे एकत्र येऊन ताई व मुले असे कोपरे केले होते .येथे येणाऱ्या प्रत्येकाला मनसोक्त आनंद लुटायला मिळावा हाच यामागचा हेतू . प्रत्येक कोपर्यावर खेळाच साहित्य ,कागद ,रंग ,फुल, फुगे,देण्यात आली आणि गमत म्हणजे एवढ्या जागेत १०० मुले असूनही कुठेही गर्दी ,गोधळ जाणवला नाही. सहज त्या त्या कोपर्यातून जाताना जाणवत होत की प्रत्येक मुलं आणि ताई तितकाच त्यांचा आस्वाद घेत होती.
बघता बघता प्रत्येक कोपरयामध्ये तोरण, आकाशकंदील,पणत्या ,फुगे ,साखळ्या पाना - फुलांच्या रांगोळ्या तयार झाल्या .त्यातीलच मोठी मुलं ताई ,दादांच्या माद्ठीने खेलघरही स्वतः प्रमाणेच नटवल .त्या कोर्या भिंती मधेही मुलांच्या प्रेमळ स्पर्शाने ,त्यांच्या किलबिलाटाने जाणं येत गेली .भिंती ,पिनाप्बोर्द बोलू लागले. एकत्र गप्पांच्या वेळी आम्ही काय - काय केल ते सांगत होती .मात्र त्यांना सर्वात भावलेली , मनाला छान वाटलेली गोष्ठ आधी सांगितली यामुळे अनोळखी तयानीही मुलांच्या मनात घर केल होत.
समईच्या शांतपणे उजळ्लेल्या ज्योतीच्या मंद प्रकाशात सुंदरशी प्रार्थना अन फराळ करून खर तर ही दिवाळी साजरी झाली. फटाके आणि पणत्यां नसतानाही दिवाळी एवढी मजेची होऊ शकते याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले व आनंदही झाला.

दिवाळी - मोठ्या मुलांची


DSC03149.JPG
या वेळेस सर्व मोठ्या मुलांनी मिळून एक मोठा किल्ला तयार केला. किल्ला आमच्या नविन आनंदसंकुल मध्ये केला आहे. अनेक वस्तु कागदच्या ऑरिगामी वापरुन बनविल्या. ग्रीटिंगच्या माध्यमातून मुलांनी घरच्यांना तसेच ताया- काकुना शुभेच्याही व्यक्त केल्या. प्रत्यक्ष दिवाळीचा दिवस उजाडला . खेळघर, कुटुंबातील व्यक्तींमुळे खूपच गजबुजून गेले होते. लहानाचे खेळ खेळताना त्यांची मजा लुटण्याचा मनमुराद आनंद मोठयानीही घेतला.नंतर एक ताई/ काकू आणि तिच्यासोबत ४-५ मुले असे गटात गप्पा मारल्या. एकमेकाना संवांदातून समजून घेऊन जवळ येणे हे खूप महत्वाचे होते.नियोजन करतेवेळी वाटले होते की १५-२० मिनिटात मुलं कंटाळतील पण प्रत्यक्ष पाहता एक तास झाला तरी कोणीच उठायला तयार नव्हते . त्यावेळी आम्हाला व मुलांना समजल की जेव्हा मोठे आणि छोटे एकमेकांना समजून घेऊन संवादाच्या एका पातळीवर येतात त्यावेळी ते किती छान नात निर्माण करू शकतात . त्यातच ताया/ काकुनी मुलांना समजून घेऊन त्यांच्यातील " खास " हे ग्रीटिंगवर लिहून त्यांना दिल्यामुळे तर मुले खूप भारावून गेली होती.
सर्वांच्या गटात मनमुराद् गप्पा झाल्यावर सर्वजण एकत्र गोलात बसून प्रार्थना म्हंटली त्यानंतर ताई -मुलांनी एकमेकाबाबत नव्याने समजलेल्या गोष्टींचे एकमेकाना सांगितल्या . हे सर्व सांगताना मुलं खूप भावूक होत होती .युवक गटातील मुलांना कॉलेज ,नोकरी मुळे रोज खेळघर मिळत नाही खेल्घारातून बाहेर पडल्यावर खेल्घारातल वातावरण , मोकळेपणा -आपलेपणा त्याची आठवण करत आसल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन आलेल्या ताईने सांगितले की आजपर्यंत वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी दिवाळी साजरी केली पण खेलाघारातल्या दिवाळीसारखी दिवाळी कुठेही पहिली नाही,जिथे मुलांना ,मोठ्यांना इतका अवकाश असतो.
या सर्व कार्यक्रमांनन्तर दिवाळीचा फराळ गप्पांसोबत चालू होता . सुरुवातीला जो लहान -मोठ्यांमध्ये दुरावा होता तो आता कुठल्या कुठे पळून गेला होता. मुलं सहजपणे सर्वांशी गप्पा मारत होते.


गर गर गिरकी


लक्ष्मीनगर मध्ये असणारी खेळघर ही जागा मुलांची आवडणारी आहे. तिथे मुलांना खेळण्यासाठी अर्थपूर्ण शिक्षण घेण्यासाठी तसेच बालपणात भर घालणारी आहे. त्यामुळे बहुसंख्य मुले गेली १६ वर्षापासून खेळघराचा लाभ घेताना दिसतात .खेळघराचा लाभ अजून जास्तीतजास्त मुलांना घेण्यासाठी खेळघरात प्रयत्न केले जातात बऱ्याच वेळा मुलाना व पालकांना देखील खेळघरात दाखल झालेल्या मुलांबद्दल चांगला बदल दिसून येतो परंतु बरीच मुले भाषेची अडचण किवा खेळघरची व्यवस्थित माहिती नसल्याने खेळघरपासून वंचित राहतात.

खेळघराला जेव्हा रतन टाटा ट्रस्टची आर्थिक मदत मिळायला लागली तेव्हा खेळघराचा मुख्य उद्देश झाला की मुलांची खेळघरातील संख्या वाढवणे त्याच उद्देशाच्या पूर्तीसाठी विविध गम्मत उपक्रम, सर्जनशीलतेला कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा उपक्रमांची आखणी करून गर गर गिरकी शिबीर आयोजित केले.गर गर गिरकी हे शिबीर ८ ते १३ वयोगटातील मुलांसाठी एप्रिल २५ ते २८ एप्रिल या दरम्यान सुट्ट्यांमध्ये घेण्यात आले. खेळघरातील सर्व कर्मचारी वर्ग सर्व गटातील मुलांनी गृहभेटी करून मुलांना व पालकांना शिबिराचे निरोप दिले.

पहिलादिवस :-(मुले २७) पहिल्या दिवशी आनंद संकुलमध्ये आमच्या मुलांनी चेहऱ्यावर, हातावर चित्र काढून नवीन मुलांचे स्वागत केले. त्यानंतर सोसायटीच्या हॉल मध्ये मुख्य उपक्रमास सुरुवात झाली. ती म्हणजे "गोलांची दुनिया " विविध प्रकारचे गोल कल्पनाशकतीला वाव या दृष्टीने कुठे कुठे गोल असतात. घेतलेल्या गिरकी पासून पृथ्वीगोलापर्यंत त्यांच्या कागदावर रचना करून कागदकला मुलांनी तयार केली.

दुसरा दिवस:- (मुले ३६) या दिवशी चित्र कथेच्या सहाय्याने सकस संतुलित आहाराविषयी माहिती
देण्यात आली. कथा सांगितल्यावर मुलांनी त्यावर आधारित चित्र काढली. त्यानंतर आजच्या विषयाला धरूनच सकस {पौष्टिक} सण्डवीच बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला प्रत्येक मुलांनी आपल आपल सण्डवीच आपल्या पद्धतीने लावून घेऊन तयार करणे हे अपेक्षित होते.

तिसरा दिवस:-(मुले ४३)
या कार्यक्रमातील तिसरा दिवस खेळघरात घेण्याचे ठरले त्यापाठीमागचा उद्देश म्हणजे खेळघराची संकल्पना सांगणे, तेथील नियम सांगणे तसेच तिथे होणाऱ्या
कार्यक्रमाबाबत म्हणजे गणित ,भाषा , सायन्स, खेळ , वाचन या कॉर्नर मध्ये प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते दिवसाखेरीस मुलांना सकस भेळ देण्यात आली . खेळघर म्हणजे काय? याची झलक मिळावी हा मुख्य हेतू होता.हे सर्व अनुभवताना शिकताना नव शिकण्याचा आनंद
त्यांच्या तोंडावर दिसत होताच. दिवसअखेरीस मुलांना सकस भेळ देण्यात आली.

चौथा दिवस:-
या दिवसामध्ये पालकांची मिटिंग ठेवण्यात आली होती. तेव्हा पालकवर्गामध्ये आई वर्गाचा मोठा सहभाग होता तर पुरुष वर्गामध्ये ८ जणांचा सहभाग होता.या मुलांनी तयार केलेल्या क्राफ्ट वर्क चे प्रदर्शन ठेवले होते खेळघरात पाठवल्याने मुलांचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल. हे पालकांनी मान्य केले आणि त्यांनी मुलांना खेळघरात नियमित पाठविण्यास तयारी दाखवली.

साध्य ----
१. ८-१० मुले खेळघराला जोडली गेली .
२. जी मुले खेळघरातून वगळत होती ती परत खेळघराशी जोडली गेली.
३. मुलांनी औपचारिक शिक्षणातून शिकण्याचा आनंद मिळत होतो त्यामुळे ते सहभागी होण्यास उत्सुक होती.


आनंदमेळा


आनंदमेळा ही खास करून पालकांसाठी घेतलेला कार्यक्रम होता त्यामधील मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना समजणे, मोठ्या प्रमाणात पालकांबरोबर चर्चा तसेच
त्यांच्याबरोबरचा संवाद नातेसबध दृढ करणे असा होता ९ जून ते १२ जून या काळात म्हणजे शैक्षणिक वर्ष चालू होण्याअगोदर हि मेळावा घेण्यात आला .तसेच या मेळाव्याचा वेळ संध्याकाळी घेतली कारण त्या दरम्यान पालकांची उपस्थिती जास्त मिळत होती. या कार्यक्रमामध्ये खेळघरातील मुल्रे, तरुण वर्ग तसेच प्राथमिक वर्गतील मुलांचा विशेष सहभाग होतो.
आनंदमेल्याच स्वरूप, दवंडी, विज्ञानजत्रा दुकानजत्रा आणि नाटकावर चर्चासत्र असे होते.

१) दवंडी - वस्तीमध्ये खेल्घारातील सर्व कार्यकर्ते व मुले मेगाफोनाच्या सहायाने आनंदमेल्याचे
निरोप दिले जात होते त्यात वस्तीतून चौकाचौकातून , घरोघरी जाऊन आनंदमेल्याचे निरोप दिले गेले .यामध्ये लोकांकडून चांगला प्रतिसाद जाणवला . दवंडीच्या प्रतिसादामुळे पुढील ३ दिवसाचा कार्यक्रमासाठी हुरूप मिळाला. दवंडीमध्ये स्थळ , काळ , ठिकाण ,विषय यासंबधी माहिती असलेले पत्रक घरोघरी वाटले.

२) विज्ञानजत्रा- विज्ञानजत्रा हा कार्यक्रम मुख्यता आनंदसकुल मध्ये घेतला गेला त्यासाठी आनंदसकुल सजविण्यात आले होते. मुलांनी पानाफुलांनी रांगोळी काढली होती. व त्याला मेनबात्यानी सजविण्यात आले होते. प्रसाद दादा या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या दादाने रोबोटाचे प्रत्क्षिक विज्ञानजत्रा याचे आकर्षण ठरले. रोबोटाचे शिबीर माध्यमिक गटसोबत घेतलेले.
या विज्ञानजत्रात शुभदाकाकु व शैलजाकाकु यांनी स्वागत व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच सुमित्राकाकुनी विज्ञानजत्रा याची संकल्पना स्पष्ट केली त्यात मुलांना विज्ञान कसे शिकवतात ? त्याची प्रत्क्षिक करून दाखविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये पालकांना खेळघरामध्ये मुलांना कसे शिकवले जाते याचा अंदाज आला. विज्ञानजत्रा यात मुलांचे ग्रुप्स करून वेगवेगळे प्रयोग ठेवण्यात आले होते. त्यात अंधश्रद्धा निर्मुलन, इलेक्ट्रोनिक सर्किट्स ,मानवी शरीराच्या अवयवांची प्रतिकृती,
माहिती व फन प्रयोग ठेवण्यात आले होते. यात जवळ जवळ -२८ पालक,५६ मुले, तसेच इतर संस्था डोअरस्टेप , समिधा तसेच अनेक कार्यकर्ती सहभागी झाले होते.

३) दुकानजत्रा - पालकांचा मुख्यतः खेळघरामध्ये येण्याचे प्रमाण कमी होते कारण वस्तीपासून अंतर जास्त त्यामुळेच दुकान जत्रेचे खेळघरामध्ये नियोजन करण्यात आले होते.जेणे करून पालकांनी खेळघर बघून आपली मुले खेळघरात नेमक काय शिकतात ते जाणून घ्यावे. दुकानजत्रा मध्ये माध्यमिक गटातील मुलांचा सक्रीय सहभाग होता यामध्ये मुलांनी मोठ्या कष्टानी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवले होते त्यात वेगवेगळे दागिने , रुमाल इ. अशा वस्तू ठेवल्या होत्या यात मुलांनी स्वतः मार्केटिंग तसेच हिशोब केले होते. तसेच पालकांना खेळघरातील उपक्रमावर आधारित फिल्म दाखविण्यात आली तसेच मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये ३० पालक,६० मुले,सहभागी झाली होती.

४) नाटक व चर्चासत्र - यात खेळघरामधील सर्व कार्यक्रमाचा आढावा कार्यक्रमा बद्दलचे मत त्यांना वाटणारे प्रश्न तसेच पालक व मुलांचा सहभाग या बद्दलचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या दिवशी मुलांनी खेळघर, क्लास , शाळा, अभ्यास पद्धती या विषयावर १५ मिनिटाचे नाटक सादर केले. हे नाटक शिक्षण पद्धतीवर प्रत्यक्ष तुलनात्कामक विचार व चर्चा घडली . या दिवसाच्या आनंदमेल्यात २५ पालक मनापासून उपस्थित होते.

साध्य ----
१. नवीन शैक्षणिकवर्षाची सकारात्मक सुरुवात करता आली . नवीन पालक व मुलाची खेळघर प्रकल्पाशी जोडणी झाली .पालकांना खेलघराची माहिती मिळाल्याने त्याचा विश्वास दृढ झाला .
२. २५ पालकांना नवीन कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यास मदत .
३. प्रौढ शिक्षण वर्गासाठी पालकाची मागणी.
४. मोठ्या प्रमाणात पालकांना एकत्रित करण्यास मदत तसेच त्यांना सकारात्मक उर्जा हि पालकानामध्ये जाणवली तसेच प्रश्नानावर चर्चा करण्याची संधी मिळाली.
५.पालकांमध्ये पुरुष पालकांची संख्या कमी होती त्यात सुधारणा होणे गरजेचे वाटले.
६.आपल्याच मुलांनी केलेल्या वस्तू पालक खूप कुतुहलाने पाहत होते व खरेदी करत होते.